*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे सावंतवाडीत जोरदार स्वागत…*
* शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित…*
*सावंतवाडी:प्रतिनिधि*
संजू परब यांनी शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत शिंदे सेनेकडून पदाधिकारी व कार्यकर्त्याच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी संजू परब यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. परब याची निवड झाल्यानंतर आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी मतदार संघात शिंदे सेना बळकट करण्यात येणार आहे. संघटनेसमवेत सर्वसामान्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडले जाणार असे परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी अशोक दळवी म्हणाले, परबांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर पक्षाला बळकटी मिळाली आहे. त्यांची काम करण्याची पध्दत अनोखी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ते पक्षाला योग्य तो न्याय देतील यात काही दुमत नाही.
सचिन वालावलकर म्हणाले, या ठिकाणी संजू परब यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यामुळे त्याचा संघटनेला फायदा होणार आहे. आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांनी पुढाकार घेवून त्यांचे नाव सुचविल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांच्या नावाला पसंती दिली. जिल्ह्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता संघटना मजबूत करायची आहे. त्यामुळे परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याला नक्कीच चालना मिळेल यावेळी लोचो यांनी ही शुभेच्छा दिल्या.
परब म्हणाले, मला जिल्हाप्रमुख पद देणार है माहित नव्हते. फक्त वालावलकर यांनी तुमचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत या असा सल्ला दिला. त्यानुसार मी मुंबईत गेलो अन्यथा मी अनेक कार्यकर्त्यांना सोबत नेले असते. मला मिळालेले पद है सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर, प्रतिक बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, बेटी पुरोहित, भारती मोरे, सुहासिनी सौदागर, नंदु शिरोडकर, देव्या सूर्याजी, सुधन कवठणकर, प्रेमानंद देसाई, क्लॅटस फर्नांडीस, दिनेश सावंत, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, सुरेश डुबळे, प्रतीक बांदेकर, अर्जित पोकळे, रोहित पोकळे, निखिल सावंत, साईल वाडकर, विनायक प्रभूझांटे, संदीप निवळे, प्रथमेश प्रभू, स्वप्रिल परब, शरद सावंत, मुकेश ठाकूर, दीनानाथ वायंगणकर, झेवियर डिसोजा, शेखर मांजरेकर आदी उपस्थित होते.