*संजू परब यांची शिवसेना “जिल्हाप्रमुख” पदी निवड.

*संजू परब यांची शिवसेना “जिल्हाप्रमुख” पदी निवड.

*कोंकण एक्सप्रेस*

*संजू परब यांची शिवसेना “जिल्हाप्रमुख” पदी निवड.

 *सावंतवाडी : प्रतिनिधि*.

शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या “जिल्हाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते प्रेमानंद देसाई यांनी दिली.

श्री. परब हे आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांची काम करण्याची पद्धत अनोखी आहे. नुकतेच ते भाजपामधून श्री. राणे यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी त्यांनी सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यांची मूळ शिवसेनेतून सुरुवात झाली. शाखाप्रमुख पासून त्यांनी हा प्रवास सुरू केला. त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद, भाजपचे प्रवक्ते अशी अनेक पदे त्यांनी सांभाळले आहेत. युवा कार्यकर्त्यांचा मोठा त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे त्यांची ताकद मोठी आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. आज त्यांची ही निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. यावेळी शिवसेना सचिव संजय माशेलकर उपनेते आनंद जाधव सभागृहाचे नेते पांडुरंग पाटील प्रेमानंद देसाई बंटी पुरोहित सचिन वालावलकर जिल्हा बँक संचालक विद्याधर परक आबा केसरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!