*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष नंबर श्वन बनवणार-शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब*

*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष नंबर श्वन बनवणार-शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब*

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष नंबर श्वन बनवणार-शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब*

*सावंतवाडी _प्रतिनिधि*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष नंबर वन येत्या काळात बनवला जाईल आमदार दीपक केसरकर हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत ते सांगतील त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण वागणार. आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक आहेत असे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले श्री परब यांचे आज सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले शेकडोच्या संख्येने शिवसैनिक व संजू परब समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले माझी ही जिल्हाप्रमुख म्हणून पहिलीच पत्रकार परिषद आहे मला या मतदारसंघात भरीव असे काम करायचे आहे आमदार दीपक केसरकर हे आमचे सर्वे सर्व आहेत ते जे काय निर्णय घेतील त्यानुसार आम्ही काम करणार आहोत मात्र कुठल्याही छोटा असो अथवा मोठा असो कार्यकर्त्याचा कुठेही कोणी अपमान केल्यास आम्ही ते सहन करणार नाही आणि अपमान होऊ दिला जाणार नाही असे काम केले जाणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आता संजू परब यांच्याकडे नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे ही जबाबदारी ते समर्थपणे पेलतील. आता शिवसेनेमध्ये नवीन सभासद नोंदणी सुरू आहे तिन्ही मतदारसंघात मोठ्या संख्येने सभासद नोंदणी अभियान श्री परब यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणार असल्याचे ते म्हणाले यावेळी अशोक दळवी नारायण राणे गणेश प्रसाद गवस नितीन मांजरेकर बाबू कुडतरकर राजू निंबाळकर गजानन नाटेकर नंदू शिरोडकर आबा केसरकर प्रेमानंद देसाई अना रोजी लो बो सरपंच सौ सौदागर सौगावकर परीक्षित मांजरेकर हेमंत बांदेकर विनोद सावंत जीवन लाड संजय पालकर, सचिन साठेलकर श्री प्रभू लक्ष्मण भालेकर रवी परब संदेश गावडे अरविंद परब चेतन गावडेआदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!