*लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, अन्यथा आंदोलन करणार!*

*लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, अन्यथा आंदोलन करणार!*

*कोंकण एक्सप्रेस*

*लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, अन्यथा आंदोलन करणार!*

*कणकवली,-प्रतिनिधि *

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक बहीणीला १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार, असे आश्वासन दिले होते. राज्यात आता महायुतीचे सरकार आल्याने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, तसे न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला रस्त्यावर उतरून सरकारच्याविरोधात आंदोलन करतील, असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हासंघटक नीलम सावंत-पालव यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन पालव-सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये दिले जातात. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने लाडक्या बहीण योजने अंर्तगत महिलांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महिलांनी महायुतीच्या पदरात मते टाकून बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटले आहेत. मात्र, लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थ्यांना १५०० रुपये मिळत आहेत. हा महिलांचा अपेक्षाभंग करण्यात आला आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलाना दरमहिन्याला २१०० रुपये लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला रस्त्यावर उतरून सरकारच्याविरोधात आंदोलन छेडतील, असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीयांच्यावतीने देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी कणकवली तालुका संघटक वैदेही गुडेकर, माधवी दळवी, उपसंघटक संजना कोलते, शहर संघटक दिव्या साळगावकर, उपसंघटक रोहिणी पिळणकर, कलमठ विभाग संघटक धनश्री मेस्त्री उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!