*कोमसाप मालवणचे आगळे वेगळे फिरते कविसंमेलन!*

*कोमसाप मालवणचे आगळे वेगळे फिरते कविसंमेलन!*

*कोंकण एक्सप्रेस*

*कोमसाप मालवणचे आगळे वेगळे फिरते कविसंमेलन!*

*आचरे ते सावंतवाडी पर्यंत २० कवी सादर करणार स्वरचीत कविता*

*शिरगांव | संतोष साळसकर*

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी येथे होणार्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोमसाप मालवण शाखेने “फिरते कवी संमेलन” घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आचरा ते सावंतवाडी या एसटी बस मधील प्रवासा दरम्यान तब्बल २० कवी आपल्या दर्जेदार कवितांचे सादर करणार आहेत. या फिरत्या कवी संमेलनाची निर्मिती कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी या शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. या संमेलनाचे निवेदन रामचंद्र कुबल करणार आहेत तर ध्वनी व्यवस्था सुरेंद्र सकपाळ, नियोजन पांडुरंग कोचरेकर करणार आहेत. या संमेलनाची निर्मिती सुरेश ठाकूर गुरुजी यांनी केली आहे.
या संमेलनात सुरेश ठाकूर गुरुजी,
गुरुनाथ ताम्हणकर, सदानंद कांबळी, पांडुरंग कोचरेकर, श्रुती गोगटे, अर्चना कोदे, रामचंद्र कुबल, सुरेंद्र सकपाळ, विठ्ठल लाकम, सायली परब, संजय परब, महेश चव्हाण, नारायण धुरी, सुगंधा गुरव, मंदार सांबारी, रमाकांत गोविंद शेट्ये, विनोद कदम, अनघा कदम, विनय वझे, मधुरा वझे आदी कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन २२ तारखेला सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर हे चाकावरती फिरते कवी संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मालवणी शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरूजी यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!