*कोंकण एक्सप्रेस*
*दाभोली येथे बाल साहित्य संमेलनाचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
दाभोली इंग्लिश स्कूल येथे आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला अआणि नवजीवन वाचनालय, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि. २१ मार्च रोजी सकाळी ८ वा. बाल साहित्य संमेलन २०२५चे आयोजन केले आहे.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष वृंदा कांबळी, निवृत्त माध्यमिक शिक्षक भरत गावडे, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे कार्यकारिणी सदस्य पडुरंग सामंत, नवजीवन वाचनालयाचे प्रकाश पालयेकर, सरपंच उदय गोवेकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, सुधीर गोलतकर, आत्माराम प्रभूखानोलकर, मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात कथा, कविता, निबंध, प्रवासवर्णन, आत्मकथन, संग्रहित, साहित्य आदी साहित्याचे संकलन केलेले विद्यार्थ्यांचा हस्तलिखित अंकाचे प्रकाशन, पांडुरंग सामंत पुरस्कृत दाभोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी ‘मी वाचलेले पुस्तक‘ यावर विशेष वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित संग्रहित काव्याचे सादरीकरण, पुस्तक प्रदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.