*कोंकण एक्सप्रेस*
*कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज जागतिक चिमणी दिन साजरा*
*मालवण : प्रतिनिधी*
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत टाकाऊ प्लास्टिक बॉटल, पुठ्ठा इत्यादींचा वापर करत पक्षांसाठी सुंदर घरटी बनविताना या घरट्यांमध्ये त्यांच्या अन्नपाण्याची ही सोय करीत जागतिक चिमणी दिन साजरा केला
यावेळी कृतिका लोहार या विद्यार्थिनीने आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो असे आपल्या मनोगतात सांगितले
प्रचंड वाढत्या उष्णतेमुळे बऱ्याच वेळा पशु पक्षांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपल्या घरासमोर अशा प्रकारची ही घरटी टांगून विद्यार्थिनी पशु पक्षां प्रति असणारी बांधिलकी जपली या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे व सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त )शिवानंद वराडकर , ऍड.एस एस पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर,शेखर पेणकर , सचिव- सुनिल नाईक ,विजयश्री देसाई, सहसचिव -साबाजी गावडे , खजिनदार – रविंद्रनाथ पावसकर ,सर्व संचालक ,शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर, यांनी सहभागी विद्यार्थी , व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.