*महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ: कोर्ले येथे भव्य आयोजन*

*महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ: कोर्ले येथे भव्य आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ: कोर्ले येथे भव्य आयोजन*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले आणि वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ:” या धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा पवित्र सोहळा गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी श्री ब्रह्मदेव मंदिर, कोर्ले येथे संपन्न होणार आहे. या यज्ञामध्ये २००ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
या दिवशी दुपारी ३ ते ६ :३० या वेळेत महारुद्र जपाभिषेक होईल. सायंकाळी ६:३० ते ७ दरम्यान महाआरती आणि मंत्रपुष्पाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ७ ते ७:३० या वेळेत मान्यवरांचे मनोगत त्यानंतर सायंकाळी ७:३० ते रात्री ९ दरम्यान महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धर्माचरण, संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री. सुधीर भास्कर रानडे (अध्यक्ष, श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले) आणि श्री. उदय भा. बापट (अध्यक्ष, वैदिक संवर्धन मंडळ, देवगड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. याशिवाय समस्त ग्रामस्थ मंडळी, कोर्ले व मुंबई यांचाही मोठा सहभाग आहे.
भाविकांनी अधिक माहितीसाठी श्री. नितीन करंदीकर (९५११७०८८१४), श्री. उदय बापट (९४२३८१८९५५) आणि श्री. सुधीर रानडे (८६००३२१०१५) यांच्याशी संपर्क साधावा.
हा धार्मिक सोहळा श्री ब्रह्मदेव मंदिर, मु.पो. कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) येथे संपन्न होणार असून, सर्व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!