*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी बाजारपेठेत घुमला फार्मर आयडी चा नारा, फार्मर आयडी काढण्यास नागरिकांना केले आवाहन*
*वैभववाडी तालुका कृषी विभाग व अर्जुन रावराणे विद्यालयाच्या वतीने आयोजित रॅलीने वेधले साऱ्यांचे लक्ष*
*वैभववाडी प्रतिनिधी-संजय शेळके*
केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम शासनाच्या वतीने राबविले जात आहेत. शेतीशी संबंधित सर्व घटकांना एकत्रित आणणारी एक क्रांतिकारी प्रणाली विकसित केली आहे यामाध्यमातून शेतकऱ्याची एक नवी ओळख निश्चित केली जाणार आहे. शेतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी दिला जाणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याचा आधार क्रमांक व जमिनीचा सातबारा याबाबत माहिती समाविष्ट असणार आहे. या फार्मर आयडी च्या माध्यमातून शेतकरी वर्गाला प्रधान मंत्री किसान योजना, पिक विमा आणि नुकसान भरपाई, डिजिटल जलद पिक कर्ज अशा सरकारी योजनांचा लाभ पारदर्शक प्रक्रिये द्वारा मिळणे सुलभ होणार आहे. याशिवाय आधुनिक तांत्रिक सहाय्य व शेतकरी वर्गाला अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे. तो तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्वरित काढावा या उद्देशाने वैभववाडी तालुका कृषी विभाग व अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आठवडा बाजाराच्या दिवशी जन जागृती करण्याच्या हेतूने बाजारपेठ तून शालेय विद्यार्थी व कृषी विभाग वैभववाडीचे कर्मचारी यांच्या वतीने रॅली काढण्यात आली. ‘घरोघरी एकच नारा.. फार्मर आयडी काढा.’, ‘फार्मर आयडी आहे खास.. शेतकरी योजना मिळणार हमखास ‘ अशा घोषणा देत विविध योजनांच्या माहीतीचे बॅनर दर्शवून बाजारपेठेतील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील वाडी वस्ती व गावातील सर्व सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आयडी चे महत्व सांगून त्यांना आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन फार्मर आयडी काढण्यास आवाहन करा असे कृषि अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी- निरंजन देशमुख, मुख्याध्यापक बी.एस.नादकर
मंडळ कृषि अधिकारी यु.जी.मंदावाड, एम.के. शिंदे
कृषिपर्यवेक्षकपी.बी.लांबोर,.ए.आर.पाटील, व्ही.एस.तिरवडे कृषिसहाय्यक-बी.एस.वाघमोडे,ए.एच.पाटील,आर.एस.शेळके,आर.आर.काळे,व्ही.एस.मुळे,डी.डी.मसेकर,एस.एस.घोडामएम.एम.भुजंग,एस.डी.नलवडे,वाय.डी.जाधव,पाणलोट डब्ल्यू.डी.टी. तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.