*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुखपदी भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांची नियुक्ती*
*मालवण प्रतिनिधी*
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख पदी येथील भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री. केळुसकर यांना प्रदान केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी रामचंद्र परब, लवू कोळेकर, मंगेश आचरेकर, आनंद करावडे, भिवा भोसले, चंद्रकांत खोत, ऋषिकेश चव्हाण, भिवा गोठणकर, लक्ष्मण महाभोज, स्वप्निल केळुसकर, गुरुप्रसाद केळुसकर आदी उपस्थित होते.