*साळिस्ते येथे छावा चित्रपट पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती*

*साळिस्ते येथे छावा चित्रपट पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती*

*कोंकण एक्सप्रेस*

*साळिस्ते येथे छावा चित्रपट पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती*

*देवगड : प्रतिनिधि*

साळिस्ते गुरववाडी होळी चव्हाटा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवानचरित्रावर आधारित छावा चित्रपट पाहण्यासाठी साळिस्ते येथील ग्रामस्थांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून चित्रपट पाहिला. सदर चित्रपट हा साळिस्ते गुरववाडी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. साळिस्ते गावातील लहान, थोर लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहावा या हेतूने या चित्रपटाचे नियोजन करण्यात आलेले होते. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी साळिस्ते येथील सामाजिक कार्यकर्ते ओमकार गुरव, साळिस्ते उपसरपंच जितेंद्र गुरव, वाडी प्रतिनिधी रामचंद्र गुरव व अनंत गुरव, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गुरव, सौरभ गुरव, सार्थक गुरव, स्वराज गुरव, हरेंद्र गुरव, गौरव गुरव, राजेश गुरव, सुराज गुरव आणि सर्व ग्रामस्थ यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम पार पडला. शेवटी सर्वच ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानत कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!