*कोकण Express*
*युवा सेनेच्या गितेश कडूवर तात्काळ कारवाई करा…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रा.प. महामंडळात कार्यरत असलेले युवा सेनेचे पदाधिकारी गितेश कडू यांच्यावर तात्काळ कारवाई करा, या मागणीसाठी भाजपा व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले. विभाग नियंत्रक यांची भेट घेत श्री. कडू यांच्यावर कारवाई न झाल्यास कार्यालयात ठाण मांडून बसण्याचा इशारा दिला. त्यानंतर विभाग नियंत्रकांनी चौकशी अधिकारी नेमून उचित कार्यवाही करण्याचे पत्र दिले. मात्र सात दिवसात निलंबनाची कारवाई न झाल्यास विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर केलेल्या टीकेचा युवा सेनेकडून कणकवलीत निषेध करण्यात आला होता. यावेळी रा.प. महामंडळात कार्यरत असलेले युवा सेना जिल्हाध्यक्ष गितेश कडू उपस्थित होते. श्री. कडू हे बुधवारी कामावर असतानाही या कार्यक्रमाला उपस्थित कसे राहतात? रा. प. महामंडळाचा कर्मचारी एखाद्या पक्षाचे पद घेत असेल तर त्यांना बडतर्फ करण्याची तरतूद आहे. मात्र अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. श्री. कडू यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास कार्यालय सोडणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांना दिला.
यावेळी अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादीही झाली. अखेर विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून अहवालानंतर कारवाईचे लेखी आश्वासन श्री. रसाळ यांनी दिले. मात्र संबंधितावर निलंबनाची कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा भाजपने दिला. यावेळी युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री रूपेश कानडे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत, प्राची कर्पे, नितीन पाडावे, सागर राणे, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, आनंद बांदल, गणेश तळगावकर,स्वप्निल चिंदरकर, आनंद घाड़ी, विजय इंगळे, पप्पू पुजारे,ऋतिक नलावड़े, वैष्णव गोसावी व इतर उपस्थित होते.