*कोकण Express*
*उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा…*
*नितेश राणे; सचिन वाझेवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उद्धव ठाकरे हेच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेचे गॉडफादर आहेत.त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.तसेच वाझेवर ठाकरेंचा राजकीय वरदहस्त असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
सचिन वाझे , परमवीर सिंग ही छोटी प्यादी आहेत. जर आंबानिंच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा फक्त पब्लिसिटी स्टंट असेल तर हा पब्लिसिटी स्टंट कोणाच्या सांगण्यावरून केला ? याचेही उत्तर एनआयए च्या तपासात येऊन यामागचा असली मास्टरमाइंड उघड होईल असे राणे म्हणाले.
ज्या दिवशी वाझेला अटक झाली त्यादिवशी सकाळी वाझेची काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी भांडुपला संजय राऊत यांच्या आमदार भावाच्या ऑफिसबाहेर काय करत होती ? याचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे असे आ.राणे म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी ‘हमाम मे सब नंगे होते है’ असं म्हटलंय पण त्यांचा हमाम वेगळा असेल..आमचा हमाम वेगळा आहे. आमची जनतेशी बांधिलकी असल्याचे राणे म्हणाले.