*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर भराडी माते चरणी लीन…*.
*मालवण : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर यांनी नुकतीच आंगणेवाडी येथे सपत्नीक भेट देऊन श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने बाब्या आंगणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रवींद्र खेबुडकर म्हणाले श्रीदेवी भराडी मातेची महती सर्व दूर असून सिंधुदुर्ग जिल्हा येथे काम करताना भराडी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज भराडी मातेच्या दर्शनाला सह पत्नीक आलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय कामकाज आपल्या हातून चांगल्या पद्धतीने घडावे यासाठी मातेच्या चरणी आज लीन झालो. भराडी मातेच्या आशीर्वादाने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपण यशस्वीपणे काम करणार असून आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने दिलेली ही मायेची शाल आणि आजचा मानसन्मान आपण कायम स्मरणात ठेवणार आहोत.
यावेळी पोलीस पाटील पंकज आंगणे,ग्रामसेवक युगल प्रभुगावकर,रघुनाथ आंगणे,नारायण आंगणे,शांताराम आंगणे,सुधीर आंगणे, समीर आंगणे, सुरेश आंगणे, राजू आंगणे, रघुनाथ उर्फ भाऊ आंगणे, सुरेश राणे, बाबू आंगणे,अनंत आंगणे,नंदू आंगणे, सतीश आंगणे, आणि आंगणे कुटुंबीय उपस्थित होते.