*कोकण Express*
*शेवटी पालिका प्रशासनाने स्टॉल पुन्हा काढला*
वारंवार सुचना देवून प्रतिसाद न दिल्याने कारवाई, मुख्याधिकार्यांचे म्हणणे…
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
वारंवार कल्पना देवून सुध्दा पुन्हा स्टॉल उभारल्याचे कारण पुढे करुन रवी जाधव यांचा “तो” वादग्रस्त स्टॉल आज पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढला. हि कारवाई आज दुपारी करण्यात आली. या कारवाई बाबत श्री.जाधव व त्यांच्या कुंंटूबियांकडुन नाराजी व्यक्त करण्यात आली असून, “डीक्री”च्या जागेत अन्य स्टॉल असताना आपल्यावर कारवाई का?, असा सवाल जाधव कुंटूबियांनी केला आहे.
तर आपण त्यांना यापुर्वी समज दिली होती. तसेच स्टॉल काढण्याची नोटीस दिली होती. तरीही त्यांच्याकडुन कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपण प्रशासन म्हणून ही कारवाई केली, असे मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले.
जाधव यांचा स्टॉल काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडुन पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.त्यानुसार सकाळी ११ पालिका कर्मचार्यांना घेवून श्री.जावडेकर जाधव यांच्या स्टॉलकडे गेले आणि त्यांनी ही कारवाई केली.यावेळी जाधव कुंटूंबियांनी नाराजी व्यक्त केली. आमच्या सारख्या गरीबावर अन्याय करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच डीक्री झालेल्या जागेत आमचेच दुकान नाही,तर अन्य दुकाने सुध्दा आहेत.त्यामुळे आमच्यावर कारवाई का? असा प्रश्न केला आहे.दरम्यान या कारवाई बाबत मुख्याधिकारी जावडेकर यांनी आपली भूमिका विषद केली.वारंवार कल्पना देवून सुध्दा जाधव यांनी सहकार्य केले नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान यावेळी अन्य काही स्टॉल हटविण्याच्या सुचना श्री जावडेकर यांनी दिल्या.