*कोंकण एक्सप्रेस*
*मा आमदार उपरकर यांच्यावर टीका कराल तर तुमचे सर्व कारनामे उघड करू : अभय देसाई*
*माजी सभापती अंकुश जाधव यांनी दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी काय योगदान दिले ?*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजी आमदार व शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते जी जी उपरकर यांच्यावर टीका करण्यापेक्षा माजी सभापती अंकुश जाधव यांनी दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी काय योगदान दिले ते अगोदर जाहीर करावे आणि मगच टीका करावी. मा आमदार उपरकर यांच्यावर टीका कराल तर तुमचे सर्व कारनामे उघड करू आणि वस्त्रहरण काय असते ते दाखवू असा इशारा दोडामार्ग उबाठा शिवसेनेचे युवा पदाधिकारी अभय देसाई यानी दिला.
पालकमंत्री नितेश राणे हे (आर एस एस) संघाची स्क्रिप्ट वाचत आहेत त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होत आहे अशी टीका उबाठा सेनेचे नेते माजी आमदार जी जी उपरकर यांनी केली होती त्यावर माजी सभापती अंकुश जाधव यांनी पलटवार करत पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केल्यास वस्त्रहरण करू असा इशारा दिला होता. त्याचा खरफुस शब्दात उबाठा शिवसेना युवा पदाधिकारी अभय देसाई यांनी समाचार घेतला. माजी सभापती अंकुश जाधव हे दोन वेळा सभापती होते तरी त्यानी दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी काय योगदान दिले ही जाहीर करावे. उपरकर यांनी आपल्या आमदार फंडातून वारंवार दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी निधी दिला आहे याची माहिती घ्यावी. माजी आमदार उपरकर यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे तुमच्यासारखी दोडामार्ग तालुक्या पुरती मर्यादित नाही त्यामुळे त्यांचे वस्त्रहरण करण्यापेक्षा पक्षातील तुमचे स्थान अगोदर मजबूत करा पक्षात तुमची काय पात्रता आहे ते ओळखा असा श्री देसाई सणसणीत तोला जाधव यांना लगावला. पालकमंत्री हे शासनाचा भाग आहेत त्यांना हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणे तसेच मुस्लिमाना लक्ष करणे शोभत नाही त्यांच्याच पक्षात या कारणावरून नाराजी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यानीही मुस्लिम समाजाविषयी द्वेष भावना बाळगणाऱ्या पालकमंत्री राणे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे हवी तर त्याची ऑडियो क्लिप पाठवून देऊ ती बघावी त्यामुळे उपरकर यांच्यावर टीका केल्यास तुमचे सर्व कारनामे बाहेर काढू मग कोणाचे वस्त्रहरण होईल हे समजेलच असा इशारा अभय देसाई यांनी अंकुश जाधव यांना दिला आहे.