*कोंकण एक्सप्रेस*
*हळवल येथे उद्या शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हळवल येथील शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने 17 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 17 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिवप्रतिमेचे पूजन, सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी 7 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ, रात्री 8:30 वाजता आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार 2025 प्रदान सोहळा, रात्री 9 वाजता ग्रामदेवता दशावतार नाट्यमंडळ, बिडवाडी यांचे दशावतारी नाटक होणार आहे. या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळ, हळवलच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते राजू राणे यांनी केले आहे.