पडेल जि. प. शाळा नं.१ला स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान*

पडेल जि. प. शाळा नं.१ला स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान*

*कोंकण एक्सप्रेस*

*पडेल जि. प. शाळा नं.१ला स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रदान*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

अमेरिकेला स्थायिक असलेल्या अतुल तानवडे यांच्या १ लाख ३० हजार रुपये देणगीतून कु.लक्ष्मण व कु. अमोघ यांचे नावे ६५ इंची स्मार्ट डिजिटल बोर्ड जि.प.शाळा पडेल नं.१ प्रदान करण्यात आला. हा स्मार्ट डिजिटल प्रदान सोहळा शाळा पडेल नं.१ येथे नुकताच संपन्न झाला.
या स्मार्ट डिजिटल क्लासरुमचं उदघाटन सरपंच भुषण पोकळे व देणगीदार प्रतिनिधी कु. मयंक तानवडे व संपदा तानवडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी डाएट सिंधुदुर्गचे अधिव्याख्याता डॉ. लवु आचरेकर, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, माजी सरपंच विकास दिक्षीत, केंद्रप्रमुख अशोक जाधव, SMC अध्यक्ष डॉ. आरोही दिक्षीत, पडेल हायस्कूल मुख्याध्यापक हिराचंद तानवडे तसेच बहुसंख्य पालक, ग्रामस्थ शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. अमेरिकेला असणाऱ्या अतुल तानवडे कुटुंबाने शाळेची गरज लक्षात घेऊन १ लाख ३० हजार रुपये एवढी रक्कम देऊन नवीन तंञज्ञानाचा शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगला व प्रभावी वापर करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल या हेतुने हा स्मार्ट बोर्ड दिला आहे. सर्वांनी तानवडे कुटुंबियांचे आभार मानले. हा बोर्ड जि.प. शाळेला मिळावा यासाठी विशेष प्रयत्न संपदा तानवडे SMC सदस्य यांनी केले.
या प्रसंगी सरपंच भुषण पोकळे, डॉ. लवू आचरेकर, प्रजापती थोरात, विकास दिक्षीत, हिराचंद तानवडे, संपदा तानवडे, डॉ. आरोही दिक्षीत उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केंद्रप्रमुख अशोक जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन मुख्याध्यापिका प्रिया आपोतीकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!