*कोंकण एक्सप्रेस*
*कला क्षेत्रातील UCEED परीक्षेमध्ये अथर्व गोडवे देशात 30 वा क्रमांक*
*सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यात यश मिळवणारा पहिला विद्यार्थी*
*चि. अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील अथर्वअवधूत गोडवे याने कला क्षेत्रातील UCEED या देशव्यापी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशात 30 वां क्रमांक प्राप्त केला आहे.कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथून असे यश प्राप्त करणारा पहिलाच विद्यार्थी आहे.
या यशामुळे अथर्व ला
IIT मुंबई, दिल्ली, हैद्राबाद तसेच अनंत अंबानी कॅम्पस अहमदाबाद येथे पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
कोरोना काळात स्वकर्तृत्वावर कला क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अथर्व ने 10 वीच्या परीक्षेत 93% गुण प्राप्त करून शालेय शिक्षणात ही कौतुकास्पद यश मिळवले परंतु आर्ट, ड्रॉइंग ची प्रचंड आवड असल्याने तेच आपले करिअर निवडून कोल्हापूर येथे BRDS मध्ये पदविका शिक्षण पूर्ण केले. या कालावधी मध्ये अथर्वचे 2 वेळा मुंबई येथे आर्ट गॅलरी मध्ये पोर्ट्रेट झळकले. आणि त्यानंतर मुंबई व गोवा येथे झालेल्या पदवी प्रवेश परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले.देशभरात 30 व क्रमांक प्राप्त केलेल्या अथर्व चे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व्यवस्थापक अवधूत गोडवे यांचा तो मुलगा आहे.