मालवणात आज दिमाखात साजरा होणार आम. निलेश राणे यांचा वाढदिवस

मालवणात आज दिमाखात साजरा होणार आम. निलेश राणे यांचा वाढदिवस

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणात आज दिमाखात साजरा होणार आम. निलेश राणे यांचा वाढदिवस*

*दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी*

*मालवण ः प्रतिनिधी*

चार महिन्यापूर्वी मालवण कुडाळ मतदार संघांचे आमदार बनलेल्या निलेश राणे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याच्या दृष्टीने आम.निलेश राणे यांच्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जय्यत तयारी केली असून आम. राणे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मालवणमधील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर हजारो शिवसैनिक आणि राणे समर्थकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने कोकणात प्रथमच शिवायन हे शिवचरित्रावर आधारित महानाट्य सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.

मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर दत्ता सामंत यांनी आज सायंकाळी कार्यकर्त्यांसमवेत आम. निलेश राणे वाढदिवस कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करत आढावा घेतला. बबन शिंदे, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, विश्वास गांवकर, मधुकर चव्हाण, किसन मांजरेकर, विहार कोदे, राजन वराडकर, प्रशांत बिरमोळे, दिलीप बिरमोळे, प्रीतम गावडे, भाई मांजरेकर, निशय पालेकर, ऋत्विक सामंत, बाळू नाटेकर, राजू बिडये, सोनाली पाटकर, नीलम शिंदे आदी व इतर उपस्थित होते.

मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस हा १७ मार्च रोजी सिंधुदुर्गसह रत्नागिरी तसेच इतरत्र धूमधडाक्यात साजरा केला जातो. चार महिन्यापूर्वी निलेश राणे हे मालवण कुडाळ मतदार संघांचे आमदार बनले. आमदार राणे यांच्या विजयात खऱ्या अर्थाने विजयचे शिल्पकार बनलेल्या शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळचा आम. निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा मनोदय अलीकडेच व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आम. निलेश राणे यांचा वाढदिवस १६ मार्च रोजी मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर साजरा करण्याचे ठरविले. उद्या रविवारी रात्री ७ वाजता आम. राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यानंतर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली शिवपर्व ‘शिवायन’ हे सुमारे २०० कलावंतांच्या सहभागातील महानाट्य सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या नाटकानिमित्ताने नाट्यरसिकांसमोर मांडण्यात येणार आहे. हे महानाट्य सर्वसामान्य शेतकरी, महिला भगिनी यांनाही पाहता यावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. बोर्डिंग मैदानावर सुमारे पंधरा ते वीस हजार नाट्यरसिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून भव्य स्टेज उभारून त्यावर किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला आहे.

आमदार नीलेश राणे यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. आम. राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी असला तरी सध्या अधिवेशन सुरू असल्याने आम. निलेश राणे यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याने वाढदिवस १६ मार्च रोजी साजरा होणार आहे. बोर्डिंग ग्राउंड येथील वाढदिवस कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार किरण सामंत शिवसेना नेते बाळा चिंदरकर, संजय आंग्रे संजय पडते यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!