*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थांनी ‘ छावा , चित्रपट पाहिला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात जाऊन एकत्रितपणे छावा या ऐतिहासिक चित्रपटाचा आस्वाद घेऊन महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपला इतिहास हा उद्बोधक असतो याचा प्रत्यय छावा चित्रपट पाहून विद्यार्थानी अभिमान व्यक्त केला . हा चित्रपट संपूर्ण विद्यार्थ्यांना दाखविण्याचे नियोजन प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका शर्मिला केळुसकर मॅडम यांनी केले चित्रपटासाठी अर्धी रक्कम सर्व विद्यार्थाची भरून छावा हा चित्रपट दाखविण्याची जबाबदारी उचलून महत्चाचे कार्य केले त्याबद्दल सर्व स्तरांतून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे . सर्व विद्यार्थ्यांना चित्रपट व्यवस्थित दाखवून सांभाळून आणण्याचे महत्वाचे काम सौ आर आर कदम मॅडम सौ तेली मॅडम यांनी केले सर्व पालकांनीही सहकार्य करून उत्तम प्रतिसाद दिला मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर व पर्यवेक्षक श्री वणवे सरांनी या उपक्रमाला प्रोत्साहन देवून उपकृत केले प्रशालेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर वृंदांनी कौतुक केले .