*कोंकण एक्सप्रेस*
*MKCL Olympiad Movment परीक्षेत अक्षता मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय*
*कणकवली : प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. अक्षता भालचंद्र मेस्त्री ही MKCL मार्फत घेण्यात आलेल्या मॉम परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत सुयश संपादन केले.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शालेय शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. याच अनुषंगाने संगणक क्षेत्रातील ज्ञान व माहिती मिळविण्या संदर्भात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी MKCL मार्फत ही विशेष परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु. अक्षता भालचंद्र मेस्त्री यीने सुयश संपादन करत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या तीच्या सुयशा बद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा.श्री. सतीश सावंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन श्री.आर.एच. सावंत सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण,प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, तसेच मधुरा कॅप्युटर सेंटर,कणकवली यांच्या कडून तीचे विशेष कौतुक करण्यात आले..