*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली येथे “छावा” चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी*
*नवदुर्गा युवा मंडळ आणि ग्रामविकास मंडळाकडून आयोजन*
*फोडाघाट : प्रतिनिधि*
नवीन कुर्ली येथे होळी उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी संपूर्ण देशात गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेला ऐतिहासिक “छावा” चित्रपट होळी उत्सवानिमित्त नवीन कुर्ली भवानी मैदान येथे मोफत दाखवण्यात आला.
यावेळी गावातील आणि फोंडा पंचक्रोशीतील सुमारे १००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट मोठ्या स्क्रिन वर पहिला. यावेळी शाळेतील मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. नवीन कुर्ली भवानी मैदान येथे “छावा” चित्रपट मोठ्या स्क्रिन वर पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती. त्यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नवदुर्गा युवा मंडळ आणि ग्रामविकास मंडळाचे आभार मानले.