*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेनेवाढीसाठी सभासद नोंदणी व प्रमुख पदाधिकारीची नेमणुकीसाठी वेंगुर्ला मध्ये बैठकीचे आयोजन*
*वेंगुर्ले (प्रतिनिधी)-प्रथमेश गुरव*
वेंगुर्ले तालुक्यात 31 मार्च पर्यंत नवीन एकूण 5000 सभासद व वेंगुर्ले शहरात 1000 सभासद नोंदणी करावयाची असून तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रमुख पदाधिकारी यांनी याबाबत आतापासूनच सुरुवात करावी, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजित बैठकीत केले.
वेंगुर्ले तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसंदर्भात सायंकाळी तालुका मध्यवर्ती कार्यालयात मार्गदर्शन बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. वालावलकर बोलत होते.
यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवा तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे , कोचरा सरपंच योगेश तेली ,उपशहरप्रमुख आर एम परब ,युवासेना तालुका संघटक विशाल राऊत ,उभादंडा माजी उपसरपंच गणपत केळुस्कर, शाखाप्रमुख प्रकाश मोटे, प्रेमानंद जाधव, तालुका सरचिटणीस सचिन राऊळ , समीर दाभोलकर, विभाग प्रमुख नयन पेडणेकर, विक्रांत विक्रांत डीचोलकर, अरुण घोगळे, युवा शहर संघटक वेदांग पेडणेकर, स्वप्नील होरुमनी आदी उपस्थित होते. याबाबत सभासद नोंदणी संदर्भात पदाधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 2500 व दुसऱ्या टप्प्यात 2500 अशी एकूण पाच हजार इतकी संपूर्ण तालुक्यात सभासद नोंदणी करावयाची आहे. तसेच शहरात 1000 सभासद चे उद्दिष्ट आहे. दरम्यान दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार आहे, अशी त्यांनी माहिती दिली. यावेळी सर्वप्रथम शिवसेना शाखाप्रमुख आप्पा मांजरेकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पर्यटन वाढी संदर्भात व रोजगार उपलब्धतेसाठी शिवसेनेमार्फत आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती – पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असून दिनांक 22 मार्च पर्यंत फिरते विक्री केंद्र व टुरिस्ट गाडी खरेदीसाठी 15 ते 35 टक्के शासकीय अनुदान मिळणार असून याबाबत सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनील मोरजकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नितीन मांजरेकर यांनी यावेळी केले. दरम्यान यासाठी विविध आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सावंतवाडी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.