*कोंकण एक्सप्रेस*
*गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणसाठी पाणी गुणवत्ता प्रशिक्षण महत्वाचे- डॉ. उमेश पाटील*
*प्रशांत वाडेकर ,देवगड*
ग्रामीण भागांमध्ये नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे व साथीच्या रोगांना आळा बसावा याकरीता पाण्याच्या गुणवत्तेत सनियंत्रण व सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचे काम प्रभावीपणे होण्याकरिता अशा प्रकारचे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी देवगड डॉ. उमेश पाटील यांनी केले.
पंचायत समिती देवगड आयोजीत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण इंद्रप्रस्थ सभागृहात संपन्न झाले. या प्रशिक्षणाचा शुभारंभ सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत जल जीवन मिशन व पाणी गुणवत्ता, पाणी नमुने गोळा करणे बाबतची माहिती, क्षेत्रीय तपासणी संच FTK माहिती, प्रयोगशाळा तपासणी अहवाल, स्वच्छता सर्वेक्षण, WQMIS प्रणाली, पाणी गुणवत्ता व आरोग्य याबाबतची माहिती जिल्हा तज्ञ मार्गदर्शक श्रीनिवास कांदळगांवकर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ समाधान ताटे यांनी दिली. या कार्यशाळेत आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, डाटा ऑपरेटक मोहीनी खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रशिक्षणात देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन विनायक धुरी तर आभार हर्षदा बोथीकर यांनी मानले.