*कोंकण एक्सप्रेस*
*वाडा येथे होममिनिस्टर व पाककला स्पर्धा उत्साहात*
*होममिनिस्टरची विजेती निकिता जाधव तर पाककला स्पर्धेत वृषाली केसरकर प्रथम*
* देवगड : प्रशांत वाडेकर*
वाडा ग्रामपंचायतमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी पाककला व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाककला स्पर्धेत १४ महिलांनी तर होम मिनिस्टर स्पर्धेत ४० महिलांनी सहभाग घेतला होता. पाककला स्पर्धेत वृषाली विकास केसरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला तर होम मिनिस्टर स्पर्धेची निकिता जाधव विजेती ठरली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना भेटवस्तू व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवारी ग्रामपंचायत वाडाच्या वतीने ग्रामपंचायत येथे महिला पाककला स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिलानी सहभाग घेतला. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण माजी सरपंच उल्का जोशी व सरपंच सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर ग्रामसेविका प्रिती ठोंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर परब, ग्रामपंचायत सदस्य अविनाश सहस्त्रबुद्धे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बिर्जे व डॉ. माधुरी जोशी व डॉ.सुमित्रा पाटील महाराष्ट्र महिला विकास केंद्र व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पाककला स्पर्धेत नाचणी या धान्यापासून पदार्थ बनविणे हा विषय देण्यात आला होता. पाककला स्पर्धेत १४ महिलांनी सहभाग घेतला होता तर होम मिनिस्टर कार्यक्रमात ४० महिला सहभागी झाल्या होत्या. गावातील महिलांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचा ग्रामपंचायतीने एक चांगला उपक्रम राबविला. पाककला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ग्रा. पं. सदस्या सौ. अंकिता वाडेकर १००० रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी सदस्य अविनाश सहस्त्रबुद्धे यांनी ७०० रुपये बक्षीस तर तृतीय क्रमांकासाठी सदस्या सौ. प्रतिक्षा आचरेकर व ग्रामपंचायत यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते.
पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक वृषाली विकास केसरकर, द्वितीय क्रमांक सृष्टी संतोष परब, तृतीय क्रमांक विभागून अनिता वि.जाधव व साक्षी समिर बिर्जे यांना विभागून देण्यात आला.
होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी सरपंच सुनील जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर परब व ग्रा. पं. सदस्य प्रवीण बिर्जे यांच्याकडून तीन क्रमांकांची बक्षिसे प्रायोजित करण्यात आली होती. होम मिनिस्टर प्रथम क्रमांक निकिता जाधव, द्वितीय क्रमांक सायली बिर्जे, तृतीय क्रमांक प्राजक्ता केसरकर यांनी मिळविला. विजेत्यांना सरपंच सुनील जाधव, अविनाश सहस्त्रबुद्धे, प्रवीण बिर्जे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. महिला दिन व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर परब, ग्रामपंचायत सदस्य अविनाश सहस्रबुद्धे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण बिर्जे, ग्रामपंचायत सदस्य मयुरी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य संगीता परब, ग्रामपंचायत सदस्य अंकिता वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य शमिका परब, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा आचरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप परब, प्रदीप गुरव, शिल्पा पांचाळ, विनया शिंदे, प्रिया मेस्त्री, छाया परब, अपर्णा जोशी अंगणवाडी सेविका, आशा ढोके अंगणवाडी सेविका, सुंदर अशी म्युझिक सिस्टीम पंढरीनाथ आचरेकर यांनी केली व होम मिनिस्टर चा कार्यक्रम अँकर राजू चव्हाण कुणकेश्वर यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे सादरीकरण केले.