जिल्ह्यात 26 हजार कोव्हीड लस विनावापर पडून

जिल्ह्यात 26 हजार कोव्हीड लस विनावापर पडून

*कोकण Express*

*जिल्ह्यात 26 हजार कोव्हीड लस विनावापर पडून*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40000 कोव्हिड लसिंपैकी 14000 लसीकरण*

*आमदार नितेश राणेंचा गौप्यस्फोट*

*कणकवली ः   प्रतिनिधी*

एकीकडे महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा आहे असे पंतप्रधानांकडे रडगाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गायले. राज्याला मिळालेल्या 53 लाख लसिंपैकी फक्त 23 लाख लसीकरण झाले असून उर्वरित 30 लाख लसीकरण केव्हा करणार ? सिंधुदुर्गात उपलब्ध 40 हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त 14 हजार लसीकरण झाले आहे. संसदेत शिवसनेचा गटनेता असलेल्या खासदार राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक 26 हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत ? पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार असा सडेतोड सवाल आमदार नितेश राणेंनी केला.
महाराष्ट्रात कोव्हीड लसी चा तुटवडा असल्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दाव्याचा आमदार नितेश राणेंनी चांगलीच चिरफाड केली. आधी शिल्लक राहिलेल्या 30 लाख लसीकरणाचे काय ते नियोजन करा. सिंधुदुर्गात शिल्लक 26 हजार कोव्हिड लसीकरण कधि करणार ? असा सवालही राणेंनी केला. उद्या होळी सणासाठी चाकरमानी आल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास राज्यातील सत्ताधारी केंद्रावर ठेवणार. पण दिलेल्या लसी कधी वापरात आणणार याचे नियोजनशून्य कारभार असल्याची टीका आमदार नितेश यांनी केली. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!