*कोंकण एक्सप्रेस*
*आर्थिक सक्षमतेमुळेच महिलांमध्ये निर्णय क्षमता येईल*
*शिरगांव येथ महिला दिनात सुखदा जांबळे यांचे मार्गदर्शन*
*देवगड : प्रशांत वाडेकर*
भारतीय संविधानाने महिलांना स्री पुरुष समानेनचा हक्क दिला म्हणूनच महिला शिक्षित झाली शास्त्रज्ञांपासून उच्च पदस्थ अधिकारी राष्ट्रपती पदापर्यंतची पदे भुषविता आली आहेत. मुलीला तिच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण द्या. पालकांनी आपल नव्हे तर तीच्या स्वप्ननाचा विचार करावा. आर्थिक सक्षमते शिवाय महिला निर्णयक्षम होणार नाही असे मार्गदर्शन स. ह. केळकर महाविद्यालयच्या प्राध्यापिका डॉ. सुखदा जांबळे यांनी शिरगांव येथे केले.
शिरगाव येथील पुंडलीक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या महिला विकास समिती विभागाच्यावतीने ११ मार्च रोजी जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.सुखदा जांबळे म्हणाल्या, पूर्वापावर काळापासून महिलांवर चांगले संस्कार झालेले आहेत म्हणूनच भारतीय महिला जगात सक्षम आहेत.समानतेच्या जाणीवेबरोबरच कर्त्यव्य निभावण्यात महिला कमी पडल्या नाहीत. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन संपुष्टात येईल त्याचवेळी तिच्यावर होणारे अत्याचार थांबतील कोणतेही सामाजिक बदल हे फार धिम्यागतीने होत असतात. महिला आर्थिक सक्षमते बरोबरच त्यांची शारिरीक मानसिक आणि सामाजिक संस्कृतिक प्रगती होणे तितकेच गरजेच आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच ध्येय निश्चीती करायला हवे. जगाने भले नावे ठेवली तरी स्वतःशी प्रामाणिक राहून निष्ठेने काम करा स्वतःवर विश्वास ठेवा. यशाचा मार्ग हा कष्टातूनच जातो.काहिही न करण्यापेक्षा सुरुवात केलेली नेहमी चांगली असे सांगितले.
फळप्रक्रिया अँग्रो टुरीझमकडे वळावे
ग्रामिण भागात रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. जिल्ह्यात अनेक यशस्वी महिला उद्योजिका आहेत. गवताने शाकारलेली घरे, शेणाने सारवलेले अंगण यासारखा बन्याच ग्रामिण भागातील गोष्टींचं पर्यटकांना आकर्षण आहे. शेती व्यवसायाला पर्यटनाची जोड देऊन अँग्रोटुरिझमची संकल्पनेबरोबरच येथे फळप्रक्रीया उद्योगाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. निवडलेल्या व्यवसायाचे परिपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन येथील महिलांनी घेऊन उद्योगाकडे वळावे.
या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष अरुण कर्ले उपाध्यक्ष संभाजी साटम सरचिटणीस रघुनाथ चव्हाण शिरगांव हायस्कूल शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम मुखाध्यापक शमशुद्दीन आत्तार मानद अधिक्षक सुधिर साटम प्राचार्य समीर तारी आदी उपस्थित होते.