*वेंगुर्ल्यात उत्साहात होळीचे पूजन*

*वेंगुर्ल्यात उत्साहात होळीचे पूजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ल्यात उत्साहात होळीचे पूजन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला तालुक्यात होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून गुरूवारी व शुक्रवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली.
कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुरूवारी सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्या, पोफळीच्या होळी नाचवत नाचवत मांडावर आणण्यात आली. तेथे पूजन करुन गा-हाणे करण्यात आले. वेंगुर्ला शहरात गुरूवारी रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, कलानगर, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले याठिकाणी तर शुक्रवारी सकाळी कुबलवाडा येथे उत्साहात होळी घालण्यात आली. तसेच सायंकाळी देऊळवाडा, परबवाडा याठिकाणीही होळी उत्सव साजरा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!