देवगड-पेंढरी गावातील लघु पाटबंधाऱ्याचे काम ठेकेदाराच्या मनमाई कारभारामुळे ग्रामस्थांनी रोखले

देवगड-पेंढरी गावातील लघु पाटबंधाऱ्याचे काम ठेकेदाराच्या मनमाई कारभारामुळे ग्रामस्थांनी रोखले

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड-पेंढरी गावातील लघु पाटबंधाऱ्याचे काम ठेकेदाराच्या मनमाई कारभारामुळे ग्रामस्थांनी रोखले*

*मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माजी उपसभापती दत्ताराम तिर्लोटकर व ग्रामस्थ यांनी केली तक्रार*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

देवगड तालुक्यातील पेंढरी गावातील लघु पाठबंधाऱ्याचे काम ठेकेदाराच्या मनमाई कारभाळामुळे ग्रामस्थांनी रोखले. लघु पाटबंधारा जिल्हा परिषद कढून बांधण्यात येणारा बंधारा हा पेंढरी भुताचा हेळा येथे होत नसून तो ठेकेदाराच्या मनमाई कारभारामुळे हिरांचा व्हाळ रस्त्यानजिक बांधण्यात येत आहे. या विरुद्ध माजी पंचायत समिती सदस्य दत्ताराम तिर्लोटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व ग्रामस्थ सुरेश गुरव उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणी नुसार हा बंधारा पेंढरी भुताचा हेळा येतेच व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार ग्रामस्थांनी एकमताने ठेवलेल्या जागेवरच हा बंधारा व्हावा अशी पेंढरी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांची दिशाभूल करून ठेकेदाराने तो बंधारा भुताचा हेळा या ठिकाणी न बांधता हिऱ्यांचा व्हाळ या ठिकाणी बांधण्यात येत आहे. त्यामळे या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना कोणताही फायदा होणार नाही. तसेच या बंधाऱ्यामध्ये पाणी देखील साठवण होणार नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संबंधित ठेकेदार आपली मनमानी करीत असून यामध्ये गावाचे व शासनाचे मोठे नुकसान होणार आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!