*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी : बाबुराव धुरी*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
पालकमंत्री नितेश राणे हे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला सरसकट टार्गेट करत असून त्यांचे हे वागणे जातीय तेढ निर्माण करणारे आहे, जिल्ह्यात हिंदू मुस्लिम सुखा समाधानाने हातात हात घालूनराहत आहेत, मात्र नितेश राणे हे या मुस्लिम समाजावर उगाच अन्याय करत असून ओरोस येथे अतिक्रमणाच्या नावावर गादी कारखान्याची झालेली तोडफोड त्याचेच द्योतक असल्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून या मुस्लिम समाजाच्या पाठीशी शिवसेना कायम असेल असेही सांगितले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे कि, अल्प संख्यांक समाज कायमच हिंदू बांधवांचा आदर करत आला आहे, त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नसून त्यांनी आपण एकटे असल्याचे वाटून घेवू नये, कायद्यात राहणाऱ्या या बांधवाना दहशत निर्माण करून नितेश राणे यांना काय साध्य करायचे आहे हेच कळतं नाही, त्याना शांतता प्रिय सिंधुदुर्गात दंगली घडवायच्या आहेत काय? हा खरा प्रश्न आहे, या पीडित कुटुंबियाची आपण भेट घेणार असून पाठीशी असल्याचे सांगणार आहे, य या अतिक्रमण हटाव वेळी पोलीस प्रोटेक्शन घेवून पिडित अल्प संख्यांक बांधवावर अन्याय करण्यात आला त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतलेली भूमिकाही चुकीची असल्याचे धुरी म्हणाले, यासाठी आपण जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग याना निवेदन देणार असून या प्रकरणी लक्ष घालून अल्पसंख्यांक बांधवाला न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे बाबुराव धुरी म्हणाले.