*कोंकण एक्सप्रेस*
*जि.प पूर्ण प्राथमिक शाळा गवाणेच्या जिनत जावेद शेखचे सुयश*
*शिरगांव : संतोष साळसकर*
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे ची विद्यार्थिनी जिनत जावेद शेख इयत्ता पहिली हिने ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित, आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत 92% गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक मिळवला आहे.तिला वर्गशिक्षक श्रीम.अमरीन जावेद शेख यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,सहकारी शिक्षक लक्ष्मण घोटकर,सद्गुरू तळेकर,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,ग्रामस्थ ,पालक यांनी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.