*कोंकण एक्सप्रेस*
*पैसा निर्माण करण्याची संधी फक्त साधन संपत्ती मध्ये असते*
*युवकांना प्रोत्साहित केल्यामुळेच समाजाचा सर्वांगीण विकास – श्री. राजेश कांदळगावकर*
*फोंडाघाट ः गणेश ईस्वलकर*
महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेश कांदळगावकर तसेच अध्यक्ष म्हणून फोंडाघाट मधील श्री. सुंदर पारकर आणि प्रमुख अतिथी म्हणून श्री. संजय आग्रे त्याचबरोबर श्री. संस्थेचे सचिव श्री. चंद्रशेखर लिंग्रस हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आले. पाहुण्यांचे ओळख आणि कार्यक्रमाचा उद्देश प्रा. डॉ. सतीश कामत यांनी केले. जिमखाना विभागप्रमुख प्रा. जगदीश राणे यांनी महाविद्यालयाच्या संपूर्ण प्रगतीचा विविध विभागांचा अहवालाचे वाचन केले. वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी वाचून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये रितेश बावकर, प्रसाद लाड, अमोल तेली आणि ओमकार गुरव या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. प्रमुख अतिथी माननीय श्री. संजय आग्रे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांचे अभिनंदन. ज्यांना मिळाले नाही, त्यांनी प्रयत्न करा. कॉलेजमध्ये जो घडतो तो आयुष्यभर लक्षात ठेवत असतो, म्हणून नियमित प्रयत्न करीत राहिल्यास आपल्याला यश चालवून येते.
त्यानंतर संस्थेचे सचिव श्री. मा. श्री चंद्रशेखर लिंग्रस म्हणाले, विविध सांस्कृतिक, क्रीडा, एनसीसी, जिमखाना मध्ये नाविन्यपूर्ण काम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. उद्योजक व मार्गदर्शक यांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा. उद्योजक म्हणून चांगले जीवन शिक्षणामधून घडवावे. सुशिक्षित बेरोजगार म्हणून शांत बसू नये तर आपल्याला अनेक पर्याय आहेत, त्यामधून स्वतःच आदर्श उद्योजक बना.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे सर म्हणाले, शासनाच्या योजना मधून विद्यार्थी आपला व्यवसाय उभा करू शकतो. समाजामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक व्यवसाय निर्माण करून आर्थिक विकास करावा. उपलब्ध असणाऱ्या योजनांचा लाभ देशाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावण्यासाठी करावा. स्वतः व्यवसाय करता करता, इतरांनाही संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक बना असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राजेश कांदळगावकर आपल्या भाषणात म्हणाले, युवकांना प्रोत्साहित केले तरच कुटुंबाचा किंवा समाजाच्या विकासास हातभार लागतो. महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमांमधूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात फरक पडतो. स्वतःला ओळखण्याची संधी म्हणजे महाविद्यालय असते. मी कोण आहे हे शोधण्यासाठी स्वतः प्रयत्न करावेत. मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक आपल्या पाठीशी असतात. त्यामधूनच बाहेरच्या जगाची ओळख होण्यास मदत मिळते.
अध्यक्षीय भाषणात श्री. सुंदर पारकर म्हणाले, नियमित उपस्थिती म्हणजे अनेक पारितोषिकांचे मानकरी होय. ज्ञान मिळवण्यासाठीचे प्रमुख साधन म्हणजे महाविद्यालय असतात. या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये सन्मानाने करावा व जीवन आनंददायी बनवावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. रिया मेस्त्री या विद्यार्थिनीने, सूत्रसंचालन कु. नीता धुरी व कु.कोमल जोईल आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले.