*कोंकण एक्सप्रेस*
*विज्ञान हे मानवासाठी वरदान आहे हे सिद्ध करूया – श्रीमती विजयश्री देसाई*
*मालवण*
विज्ञान हे मानवासाठी वरदान आहे यासाठी आज प्रयत्न होणे गरजेचे आहे.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोगातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला असून सकारात्मक विचार ठेवून विज्ञानाचा विचार मानवतेसाठी केला पाहिजे यासाठी हे विज्ञान मानवतेसाठी आहे हे सिद्ध करूया असे उद्गार प्रशालेच्या माजी प्रयोगशाळा परिचर व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ च्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित विज्ञान कार्यक्रमात काढले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेतून इयत्ता ५वी ते ९वी या गटातून डॉ .सी व्ही रमन व जयंत नारळीकर अशा दोन दालनातून एकूण ५७प्रतिकृती सादर केल्या गेल्या.या प्रतिकृतीतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टी कोना चा मागोवा घेण्यात आला. तसेच यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे
गट ५ वि ते ७वी
प्रथम क्रमांक :
प्रतिकृतीचे नाव:व्याक्युम क्लिनर
१)पलक महाभोज
२)वेदिका भोजने
द्वितीय क्रमांक:
प्रतिकृती चे नाव :रेन डिटेक्शन
१) वेदान म्हाडगुत
२) तेजस मेस्त्री
३) निखिलेश मेस्त्री
तृतीय क्रमांक
प्रतिकृतीचे नाव :सांडपाणी व्यवस्थापन
१)चंदना शेट्टी
२)लवली गुजर
३)अक्षरा शेरे
गट आठवी ते नववी
प्रथम क्रमांक :
प्रतिकृतीचे नाव: इलेक्ट्रोप्लेटिंग
१)स्वरा पेंडुरकर
२) ईशा ताम्हणकर
द्वितीय क्रमांक
प्रतिकृतीचे नाव: पवन ऊर्जा
१)ओंकार रोहीलकर
२)आयुष कोत्रे
तृतीय क्रमांक
प्रतिकृतीचे नाव: वॉटर पुरिफायर
१) यामिनी म्हाडगूत
२)सिद्धी महाभोज
या वेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर वराडकर मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे पर्यवेक्षक व विज्ञान प्रमुख श्री.महेश भाट सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यालयातील चाललेल्या विज्ञान उपक्रमाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल श्री.शिवानंद वराडकर ॲड श्री.सोनू पवार अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर सचिव सुनील नाईक उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर श्री शेखर पेणकर खजिनदार श्री श्याम पावसकर व सर्व संचालक व सल्लागार यांनी यशस्वी विद्यार्थ्या च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.