कोकण दिगंबर जैन समाज व जैन कासार समिती च्या अध्यक्षपदी दयानंद यशवंत मांगले यांची निवड

कोकण दिगंबर जैन समाज व जैन कासार समिती च्या अध्यक्षपदी दयानंद यशवंत मांगले यांची निवड

*कोकण Express*

*कोकण दिगंबर जैन समाज व जैन कासार समिती च्या अध्यक्षपदी दयानंद यशवंत मांगले यांची निवड*

*देवगड ः प्रतिनिधी*

कोकण दिगंबर जैन समाज व जैन कासार समिती च्या अध्यक्षपदी दयानंद यशवंत मांगले (देवगड) यांची, तर उपाध्यक्षपदी श्यामकांत वसंतराव भोकरे (श्रीवर्धन) ,तर सचिव पदी ऍड सोनाली अभिजित मोहिरे (देवरुख),कार्याध्यक्ष पदी कमलाकर शंकर मांगले (इंदापूर),
सहसचिव प्रभाकर मधुसूदन मांगले आणि व्यवस्थापकपदी डॉ संजय यशवंत धने (देवरुख )यांची निवड नुकत्याच झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते करण्यात आली.
कोकणातील जैन समाज हा अल्पसंख्याक समाजाच्या सोयी सुविधांपासून वंचित समाज आहे.
या समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्ती, बेरोजगार महिला, बेकार युवक युवती याना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, विविध योजनांचा लाभ मिळवून देणे,महिला सक्षमीकरणासाठी ,बचतगट ,व्यावसाय मार्गदर्शन करणे, अन्य विविध उपक्रम माध्यमातून समाज उन्नती करीता प्रयत्न करीत असताना जैन समाजात प्रबोधन करणे च्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे अध्यक्ष दयानंद मांगले यांनी या बैठकीत सांगितले.या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष दयानंद मांगले,उपाध्यक्ष श्यामकांत भोकरे,कार्याध्यक्ष कमलाकर मांगले यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
ही समिती नोंदणी कृत करण्याकरिता सचिव ऍड सोनाली मोहिरे यांनी विशेष मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.या निमित्ताने आगामी होणाऱ्या जनगणनेत प्रत्येक जैन कुटुंबाने धर्माचा उल्लेख जैन असा आवर्जून करावा व तशी नोंद केली की नाही याची खात्री करून घ्यावी .असे आवाहनही दयानंद मांगले यांनी केले
कोकण समितीची उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे सदस्य निवडण्यात आले आहेत.प्रकाश यशवंत त्रिभुवणे, श्रीकृष्ण मनोहर साळवी,चंद्रप्रभ जिंनदास बोगार, राजेंद्र गणपत ब्रम्हदनडे,मुकुंद जिंनदास बोगार,(सिंधुदुर्ग जिल्हा)
मिलिंद दत्तात्रय मांगले,राजेंद्र दत्तात्रय डोंगरे,प्रवीण प्रकाश डोंगरे,सुनील सूर्यकांत मांगले,सौ विशाखा विलास दिडपसे,उदय विठोबा(नाना) नरोटे, वृषभनाथ चंद्रकांत उपाध्ये,शशिकांत दगडू मोहिरे,विजय गणपत वारे,राजेश धनकुमार मोहिरे,यांची निवड करण्यात आली.
या पुढील काळात करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी ,सदस्य व्यवस्थापक डॉ संजय धने,सहसचिव प्रभाकर मांगले यांनी गुलाबपुष्प देवुन सन्मानीत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!