*कोंकण एक्सप्रेस*
* जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिक्षक भारती वैभववाडी च्या वतीने “मिळूनी साऱ्याजणी” कार्यक्रमाचे आयोजन*
*वैभववाडी प्रतिनिधी: संजय शेळखे*
8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिक्षक भारती वैभववाडी च्या वतीने “मिळूनी साऱ्याजणी” हा तालुक्यातील महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर सर , जिल्हा सचिव समीर परब, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन शेळके ,जिल्हा पतपेढी संचालिका विद्या शिरसाठ त्याचबरोबर तालुक्यातील सर्व महिला कर्मचारी तसेच तालुका कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तालुक्याचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या शाखा वैभववाडीची महिला आघाडी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या तालुका कार्यकारिणी मध्ये दीपा भरडकर (कोकिसरे) महिला तालुकाध्यक्ष , विशाखा कांबळे (कुर्ली) उपाध्यक्ष, संगीता आलदर , सुमैय्या. खलिफे कोळपे उर्दू कार्याध्यक्ष, दिपाली शिंदे हे सचिव उज्वला सावंत कोकिसरे सहसचिव, अरुणा सरदेसाई (नानिवडे )सहसचिव, दिपाली हिरूगडे संपर्कप्रमुख, स्वरा पवार उंबर्डे तालुका महिला संघटक तसेच आकांक्षा धामापूरकर (नाधवडे), अर्चना पाटील (करुळ) सिद्धी भाईप (नाधवडे), आरती देवळी(उंबर्डे) अर्चना मोरे(मांगवली ) यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली. या सर्वांना जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर आणि जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष विद्या शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष आडेलकर यांनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या कार्याचे स्मरण करत वैभववाडी शिक्षक भारतीच्या महिला आघाडीच्या सर्व शिलेदारांचे कौतुक केले आणि सावित्रीबाई फातिमा शेख यांच्यासारखंच सगळी बंधनं झुगारून विद्यादानाचे पवित्र कार्य असेच संघटितरित्या करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबत विद्या शिरसाठ समीर परब धनाजी भोसले यांनीही आपले मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे नियोजनासाठी तालुका संघटक रामचंद्र घावरे ,तालुका सचिव संजय कुमार आडे, महेंद्र मोरे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आघाडी सचिव स्वरा पवार यांनी केले तर तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.