*कोंकण एक्सप्रेस*
*फ्लाईंग कोकण प्रतिष्ठानच्या वतीने देवगड येथे १६ रोजी महिला दिन समारंभ*
*देवगड: प्रथमेश वाडेकर*
फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान व होय महाराजा किचन च्यावतीने १६ मार्च रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वा. या वेळेत महिला दिन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी गौरव स्त्रिशक्तीचा करण्यात येणार आहे. देवगड मधील अविश्वासनीय महिलांचा उत्सव साजरा करण्यासाठी खास कार्यक्रम, खेळ आणि मनोरंजन असे आयोजन करण्यात आले आहे. होय महाराजा किचन, किनारा होम स्टे, पवनचक्की जवळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.