*कोंकण एक्सप्रेस*
*पंचायत समिती देवगड आयोजीत पाककला स्पर्धेत सायली बिर्जे प्रथम*
*देवगड : प्रथमेश वाडेकर*
महिला दिनानिमित्त पंचायत समिती देवगडमध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने मा . गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या संकल्पनेतुन अनेक कार्यक्रमांचे आयोजन पंचायत समिती देवगडमध्ये करण्यात आले .
सकाळच्या सत्रात पाककला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक सायली बिर्जे ( मिठबांव ) , द्वितीय क्रमांक युवश्री पराडकर , तृतीय क्रमांक प्राची जाधव (जामसंडे )तर उत्तेजनार्थ १ सीमा बोडेकर (दाभोळे )उत्तेजनार्थ २ सीमा कुंभार यांनी पटकावला . प्रथम क्रमांक २००० रुपये व भेटवस्तु , द्वितीय क्रमांक १००० रुपये व भेटवस्तु , तृतीय क्रमांक ५०० रूपये व भेटवस्तु उत्तेजनार्थ २५० रू .व भेटवस्तु या सर्व बक्षिसाचे प्रायोजक पशुधन अधिकारी डॉ . माधव घोगरे व त्यांच्या पत्नी आशा पौळ / घोगरे मॅडम यांनी केले .विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले .पाककला स्पधेसाठी परीक्षक म्हणून अस्मिता मकरंद लळीत मॅडम व श्रृती श्रीरंग पाटणकर मॅडम यांनी परीक्षण केल