*नेपाळी तरुणीची आत्महत्या की हत्या?*

*नेपाळी तरुणीची आत्महत्या की हत्या?*

*कोंकण एक्सप्रेस*

*नेपाळी तरुणीची आत्महत्या की हत्या?*

*शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी पोलिसांच्या तपासावर उपस्थित केले प्रश्न*

*मिठबाव येथील नेपाळी तरुणी आत्महत्या प्रकरण*

*देवगड : प्रथमेश वाडेकर* 

मिठबाव येथे कलम बागेत काम करणाऱ्या जीरा नरे विश्वकर्मा या २० वर्षीय तरुणीने गळफास लावून केलेली आत्महत्या संशयास्पद असून तिची हत्या झाली असल्याचा दाट संशय शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी व्यक्त केला असून याबाबत देवगड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणाचा योग्य तपास करून त्या तरुणीला न्याय द्यावा, अशी मागणी श्री. साळसकर यांनी देवगड पोलिसांकडे केली आहे.
श्री. साळसकर यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, देवगड तालुक्यातील मौजे मिठबांव गोपटे तळे येथील कलम बागेतील शेत घरात ८ मार्च रोजी जिरा नरे विश्वकर्मा हीने छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. त्याची खबर कलम बागेत काम करणारा कामगार करण तीच्या रा. नेपाळ सध्या राहणार मिठबांव यांनी तक्रार आपल्या पोलीस ठाण्यात दिली. जिरा हिचा आकस्मीक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. ही नोंद तपास न करता आपण कुठल्या आधारे केली याचा खुलासा करण्यात यावा. जिरा नरे विश्वकर्मा हीचा मृत्यू आकस्मीक मृत्यू नसून हत्या झाल्याचा दाट संशय आहे.


ओढणीने गळफास लावला असे आपण म्हणत असाल तर हाताच्या ठशांची तपासणी आपण केली आहे का? आपल्या तपसामध्ये सदरच्या मृत्यू बाबत फॉरेनसीक रिपोर्ट आपल्याकडे आहे का? सदरची व्यक्ती नेपाळमध्ये राहणारी असून त्या व्यक्तीचा पासपोर्ट आपल्याकडे आहे का ? आमच्याकडे उपलब्ध माहीतीनुसार जिरा नरे विश्वकर्मा हीचा आकस्मीक मृत्यू नसून हत्या करण्यात आलेली आहे.
याबाबत आपल्यास्तरावर सखोल तपास करण्यात यावा. संबंधीत मुलीचे कुणाकुणाशी संबंध होते. रात्री २ ते ४ च्या दरम्याने जिरा हीला कोण भेटायला यायचे. याबाबतची सखोल चौकशी व्हावी. सदरचे प्रकरण आर्थीक व्यवहाराशी देवाण घेवाण करून आपल्या दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरच्या हत्येबाबतचा योग्य तपास न झाल्यास याबाबत योग्य त्या ठिकाणी दाद मागितली जाईल, असा इशारा साळसकर यांनी पोलिसांना दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!