*कोंकण एक्सप्रेस*
*मनुष्य जन्माचे सार्थक करण्यासाठी साधना करणे अनिवार्य _सौ. ज्योत्स्ना नारकर*
*महिला दिनानिमित्त कणकवलीत व्याख्यान*
*कणकवली : प्रतिनिधि *
साधना करणे हाच तणाव मुक्त आनंदी जीवनासाठी एकमेव पर्याय असून सर्वांनी मनुष्य जन्माचे सार्थक करण्यासाठी साधना करणे अनिवार्य असल्याचे सनातन संस्थेच्या सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त एस्. एम्. महाविद्यालय कणकवली, येथे तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. यावेळी सौ. नारकर बोलत होत्या.
कणकवली येथील एस्. एम्. महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने तणाव मुक्त जीवनासाठी अध्यात्म याविषयी सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर यांनी आधुनिक जीवन प्रणाली तणाव निर्माण करणारी आहे, परंतु खरे तर कोणतीही परिस्थिती ही स्वतः तणावपूर्ण नसते, तर एखाद्याच्या व्यक्तिमत्वानुरूप त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या तिच्या दृष्टिकोनावर सर्व अवलंबून असते. यासाठी तणाव म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो, त्याचे दुष्परिणाम कोणते हे समजावून सांगताना जीवनातील अध्यात्माचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश कदम सर यांनी केले, तर सूत्र संचालन सौ. निधी तायशेटे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला सनातनचे श्रीधर मुसळे, अशोक करंगुटकर, प्रशालेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.