*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / १८ मार्च गुरुवार*
◾ देशातील 56% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत ,तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड लाखाच्या पार गेली आहे – केंद्र सरकारने जाहीर केला रिपोर्ट
◾ पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरु होतील – तर महत्वाचे म्हणजे , या परीक्षा रविवारी देखील घेण्याचा मोठा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे
◾ जालना जिल्ह्यात आता लग्न तसेच अंत्यविधीला केवळ 20 लोकांनाच परवानगी असेल – तर सर्व कार्यालये आरोग्य व अत्यावश्यक सेवा 50 टक्के उपस्थितीतच सुरु राहतील – असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले
◾ राज्य पूर्व परीक्षा येत्या 21 मार्च ला होणार आहे , दरम्यान परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपक इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात येत आहेत
◾ परीक्षा निकाल अपडेट – स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला – bit.ly/2P6P9HD
◾ कर्नाटक वक्फ बोर्डानं राज्यातील सर्व मशिदी आणि दरग्यांमध्ये , रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान लाऊडस्पीकरचा वापर न करण्याबाबत ,पत्रक जारी केलं आहे
◾ राज्यात गैरप्रकार झाल्याने परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक , या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत – असे काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
◾ राज्यात आज १८ मार्च पासून तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी पडतील.
◾ तर कोकणात व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अंशतः हवामान डगाळ राहणार – तर उर्वरित राज्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे – असे हवामान विभागने सांगितले.