*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेतर्फे आज महिलांना ई बाईक प्रदान कार्यक्रम……*
*मालवण : प्रतिनिधि*
सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत तारकर्ली येथे रांजेश्वर मंदिर नजिक डॉ.केरकर व्हिला येथे सुमारे 50 महिलांना ई बाईक प्रदान करण्याचा कार्यक्रम सकाळी ठिक 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदरील कार्यक्रमासाठी मत्स्य आयुक्त श्री.कुवसेकर साहेब,मालवण खात्याचे अधिकारी,बँक ऑफ इंडिया चे प्रधान कार्यालयाचेअधिकारी श्री. मेश्राम साहेब,मालवण शाखाधिकारी,तसेच माजी आमदार परशुराम उपरकर,संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर,संस्थापक व गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर,मच्छीमार फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष श्री.मेघनाथ धुरी तसेच संस्थेच्या संचालिका आणि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून 75% अनुदान पद्धतीने सदरील ई बाईक मत्स्यव्यवसाय करणाऱ्या महिलाना प्रदान करण्यात येतील. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक सकारी संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 3500 पेक्षा जास्त सदस्य महिला असून राज्यातील ही एकमेव अशी मोठी सदस्य संख्या असलेली संस्था आहे.या संस्थेमार्फत महिला मच्छीमारांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, चतुर्थीच्या सणात गेली सुमारे 12 वर्षे कमीत कमी दरात धान्य वाटप करणे,असे कार्यक्रम हाती घेण्यात येतात. आता मच्छी विक्रीसाठी अशा ई बाईक चा वापर करुन घरोघरी मच्छी विक्री करणे महिलाना अधिक सोपे व कमी कष्टाचे होणार आहे. त्यामुळे संबंधित मत्स्य खात्याचे अधिकारी आणि बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्नेहा केरकर यांनी आपण ऋणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.