*कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणार — मंत्री नितेश राणे यांची घोषणा*

*कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणार — मंत्री नितेश राणे यांची घोषणा*

*कोंकण एक्सप्रेस*

*कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणार — मंत्री नितेश राणे यांची घोषणा*

*रत्नागिरी : प्रातिनिधी*

कसबा गावात भव्य दिव्य स्मारक उभारू , संभाजी महाराजांमुळे हिंदू नाव लावायला मिळत आहे. मी हिंदू म्हणून बोलायला आलो असून औरंगजेबाची कबर उखडून टाकू .

एके दिवशी करेक्ट कार्यक्रम केला जाईल असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरी जिल्हा संघटक नितेश राणे केले.

कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती च्या वतीने संभाजी महाराज बलिदान दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, आमदार शेखर निकम, माजी आमदार प्रमोद जठार, रोहन बने, राजेंद्र महाडिक, सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले की ज्या ठिकाणी महाराजानी लढाई केली त्या ठिकाणी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी इच्छा होती. सरदेसाई यांनी जागा द्यावी म्हणून प्रयत्न केले .स्मारकाला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस असे नाव द्यावे अशी मागणी केली .

11 मार्च स्मरण दिन असून तो दिवस कधीही विसरणार नाही. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम झाला होता तेव्हा भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती

आमदार शेखर निकम यांनी धर्मवीर छत्रपती शंभू राजांची आठवण कायम स्मरणात राहिले पाहिजे अशा प्रकारचे स्मारक झाले पाहिजे.

स्मारक चांगल्या पद्धतीने तयार होईल अशा प्रकारे प्रयत्न करून सुरुवातीला पाच एकर नंतर पन्नास एकर जमिनीमध्ये इतिहास साक्ष होईल असे स्मारक उभारून तसेच
कसबा ते शृंगारपूर हा रस्ता चांगल्या प्रकारे तयार करून इतर पुरातन वास्तू ही विकसित कराव्यात असे मत मांडले.

आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र चळवळ उभी राहिली पाहीजे . या ठिकाणी स्मारक तेवढेच उभारून चालणार नाही तर इतर व्यवस्थाही केली पाहिजे.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की औरंगजेबाची निशाणी नष्ट केली आहे. औरंगजेबाची कबर उखडून काढू सरकारने काढली नाही तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लॉंग मार्च काढू.

आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर आहोत. असे स्मारक बांधू की जगभरातील सर्व याठिकाणी नतमस्तक होऊन जातील. भव्य दिव्य आम्ही स्मारक उभे करू. हिंदू नावे लागली आहेत ती धर्मवीर संभाजी महाराजांच्या मुळे लागली आहेत .

औरंगजेबाची कबर काढण्यासाठी कोणत्या प्रकारची तारीख अथवा वेळ घोषित केला जाणार नाही असे प्रतिपादन नितेश राणे यांनी केले.
बलिदान दिनानिमित्त धाडसी खेळांची प्रात्यक्षिके तसेच संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद अधटराव, अमित ताठरे , सतीश पटेल, विनोद म्हस्के , स्वप्निल सुर्वे, मिथुन निकम अविनाश गुरव आदींनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!