देवगड कॉलेजच्या सिद्धांशू सोमाणला सुवर्णपदक

देवगड कॉलेजच्या सिद्धांशू सोमाणला सुवर्णपदक

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड कॉलेजच्या सिद्धांशू सोमाणला सुवर्णपदक*

*३८ व्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सव*

*देवगड : प्रशांत वाडेकर*

३८व्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवामध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालयच्या कु. सुधांशू समीर सोमण याने नेत्रदीपक यश मिळवले आहे. अमीटी युनिव्हर्सिटी, नोयडा, उत्तर प्रदेश येथे झालेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजआयोजित ३८ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडचा विद्यार्थी कु. सुधांशू समीर सोमण याने मुंबई विद्यापीठाच्या संघातून विविध सांस्कृतिक कलाप्रकारांचे सादरीकरण करीत भारतीय शास्त्रीय संगीत – सुवर्ण पदक, भावगीत गायन – सुवर्ण पदक, पाश्चात्य समूह गीतगायन – रौप्य पदक आणि भारतीय समूह गीतगायन – कांस्य पदक अशाप्रकारे घवघवीत यश संपादन केले आहे.

अशा या सातत्यपूर्ण कामगिरीने सुधांशूने महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत नेले आहे. सुधांशूने महाविद्यालयास युवा महोत्सवामध्ये राष्ट्रीय पातळीवर वैयक्तिक कला प्रकारामध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर सुवर्णपदक प्राप्त करून दिले आहे. सुधांशूच्या या यशामध्ये त्याची स्वतःची शिस्त, प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत तसेच त्याच्या पालकांच्या संस्कारपूर्ण संगोपनाचा मोठा वाटा आहे. सुधांशूला मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक श्री. नीलेश सावे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे यश शिक्षण विकास मंडळ, देवगडसाठी अभिमानास्पद असून सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुधांशूचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!