*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड, वैभववाडीला मोफत आरोग्य तपासणी शिबीर*
*वेंगुर्ले : प्रथमेश गुरव*
अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर व सिंधुदुर्गातील विविध ग्रामीण रुग्णालयांतर्फे मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर १५ व १६ मार्च रोजी अनुक्रमे देवगड व वैभववाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सकाळी ११ ते २ या वेळेत आयोजित केले आहे.
या शिबिरात मोफत हृदयविकार, अँजिओग्राफी, पित्ताशयात खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व्ह बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे, हाडाचे फॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, वाढलेल्या थायरॉईड गाठीवर मायक्रोवेवद्वारे (विना ऑपरेशन) अत्याधुनिक उपचार, विना टाके गर्भाशय गाठीवर उपचार, पायांची पेरिफरल अँजिओप्लास्टी (मधुमेहामुळे पायाला झालेली इजा), प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन हे उपचार व ऑपरेशन सर्व रेशनकार्ड व आधारकार्डधारकांना मोफत करण्यात येणार आहेत.
शिबिरा दिवशी ईसीजी, रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येणार असून नाव नोंदणीसाठी मोबाईल-८९२८७३६९९९ येथे संपर्क साधावा. रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.