*कोंकण एक्सप्रेस*
*कोर्ले-सातंडी धरणावरील स्वतंत्र नळ योजनेतून सात गावांना अटी शर्तीवर पाणी देणार*
*देवगड जामसंडे नगरपंचायत विशेष सभेत ठरावाला मान्यता*
*देवगड : प्रशांत वाडेकर*
देवगड-जामसंडेसाठी कोर्ले-सातंडी धरणावरून प्रस्तावित स्वतंत्र नळयोजनेवरून तेथील सात गावांना पाण्याचा वापर करण्यास परवानगी द्यावी, असा ठराव न.पं. ने द्यावा यासाठी आयोजित विशेष सभेत न.पं. च्या अटी-शर्थीना अधीन राहून या ठरावाला मान्यता देण्यात आली. या प्रस्तावित नळयोजनेवरून जे सात गाव पाण्याचा वापर करण्यास परवानगी मागत आहेत. त्यामुळे भविष्यात योजनेसारखी स्थिती पाडाघर देवगड-जामसंडेवासीयांची होवू नये, यासाठी अटी-शर्थी घालून परवानगीचा ठराव देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक नितीन बांदेकर, बुवा तारी यांनी केली.
देवगड-जामसंडे न.पं.ची विशेष कु सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, मुख्याधिकारी सूरज कांबळे, बांधकाम सभापती शरद ठुकरूल, पाणीपुरवठा सभापती सौ. प्रणाली माने, स्वच्छता सभापती आद्या गुमास्ते उपस्थित होत्या.
देवगड-जामसंडेसाठी कोर्ले सातंडी धरणावरून प्रस्तावित नळयोजनेवरून तेथील विठ्ठलादेवी, बुरंबावडे, उंडील, फणसगाव, पोंभुर्ले, कुणकवण, वाधिवरे या सात गावांना पाण्याचा वापर करण्यास परवानगी देण्याचा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर होता. या विषयावर चर्चा झाली. यावर नगरसेवक नितीन वांदेकर म्हणाले, सद्यस्थितीत देवगड-जामसंडेवासीयांना जलवाहिनी लिकेज समस्येमुळे कृत्रिम टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तत्कालीन आ. आप्पासाहेब गोगटे यांनी देव गड-जामसंडेवासीयांसाठी दहिबांव येथून ही पूरक नळयोजना निर्माण केली. पाडाघर येथून देवगडसाठी स्वतंत्र नळयोजना असूनही उर्वरित ९ गावे या योजनेवर आहेत. या योजनेचा देवगड जामसंडेवासीयांना लाभ मिळत नाही, यामुळे पूरक नळयोजनाच देवगड-जामसंडेवासीयांना उपयोगी ठरत आहे. मात्र या योजनेच पाईपलाईन जीर्ण झाली आहे.
या नळयोजनेच्या दुरूस्ती व सक्षमीकरणासाठी ९ कोटी निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली. मात्र पुढील प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष सक्षमीकरणाचे काम लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. कोर्ले-सातंडी योजना ही काळाची गरज आहे. मात्र सध्या ज्या नळया जनेवरून पाणीपुरवठा होतो ती योजना सक्षम करा अशी मागणी केली. त्याचबरोबर ज्या सात गावांनी प्रस्तावित कोर्ले-सातंडी नळयोजनेच्या विहिरीवरून पाण्याचा वापर करण्यास परवानगी मागितली आहे ती देण्याचा ठराव देण्यापूर्वी पाडाघर नळयोजनेवरून स्वतंत्र नळयोजना असूनही पाणी मिळत नाही याचा विचार -करावा असे मत मांडले. यावेळी बुवा तारी, तेजस मामघाडी यांनीही अटीशर्थी टाकून अथवा मार्गदर्शन घेवून नंतरच ठराव घेण्यात यावा अशी सूचना केली. यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर – मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी सात गावांना मागितलेल्या परवानगीचा पाणी आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही असे सांगितले.
अखेर ठरावामध्ये सात गावांनी उपांगाचा वापर न करणे, लाईटबील स्वतंत्र, पाईपलाईन स्वतंत्र, देखभाल दुरुस्तीचा खर्च संयुक्तिक, ट्रान्सफार्मर मीटर स्वतंत्र, वितरण व्यवस्था स्वतंत्र, काही बदल करावयाचा असल्यास न.पं.ची पूर्वपरवानगी घेणे, आदी अटीशर्तीसह अधीन राहून ठरावाला मान्यता देण्यात आली. चर्चेत नगराध्यक्षा साक्षी प्रभू, बांधकाम सभापती शरद ठुकरूल, पाणीपुरवठा सभापती सौ. प्रणाली माने यांनीही मते मांडली.