*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग शिवसेना च्या वतीने “जागतिक महिला दिन” कार्यक्रम उत्साहात..*
*दोडामार्ग. ः शुभम गवस*
दोडामार्ग शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी मार्फत रविवार दिनांक ०९ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, दोडामार्ग महिला आघाडी प्रमुख सौ. चेतना गडेकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे याच कार्यक्रमांमध्ये महिला जागृती मेळावा घेण्यात आला. या महिला जागृती मेळाव्याला तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी उपस्थिती दर्शवत विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चेतना गडेकर यांनी महिलांच्या समस्या तसेच महिलांवरील अत्याचार याविषयी विशेष मार्गदर्शन करताना याचे उच्चाटन कसं करण्यात येईल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिक्षिका तसेच लोककला अभ्यासक सौ. गीतांजली सातार्डेकर यांनीही महिलां सबलीकरण्याच्या माध्यमातून आपण आता खंबीर व्हायला हवे आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाताना आपल्यावरील अत्याचार सहन करता नये असे सांगत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांच्या विविध गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले त्याचप्रमाणे अनेक लहान मुलांनी सुद्धा यावेळी आपली कला सादर केली, तर महिलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी महिलांवरील विशेष प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यातील स्पर्धकांना गणेशप्रसाद गवस तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या शिरसाट यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, सुमित गवस, राकेश धर्णे, सासोली ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत यासह महिला तालुकाप्रमुख सौ.चेतना गडेकर, सौ. गीतांजली सातार्डेकर, कोलझर सरपंच सुजल गवस, मणेरी विभाग प्रमुख गुणवंती गावडे, कोनाळ उप विभाग प्रमुख प्रतीक्षा सावंत, दिव्या दळवी, माटणे उपविभाग प्रमुखांनी स्नेहल गवस, उपशहर प्रमुख रवीना सावंत, कोनाळ शाखाप्रमुख रेखा लोंढे, पल्लवी सावंत आदी उपस्थित होते.