*कोकण Express*
*जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडून कु. सोनाली लक्ष्मण राऊळ हिला शिलाई मशीन भेट…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील शिवडाव (राऊळवाडी) येथील कु. सोनाली लक्ष्मण राऊळ या गरजू गरीब कुटुंबातील मुलीला आर्थिक हातभार म्हणून स्वखर्चाने शिलाई मशीन घेवून जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तिच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, गणेश शिवडावकर, नितीन हरमळकर, रमेश राऊळ, नाना राऊळ उपस्थित होते. तर त्या मुलीच्या कुटुंबातील सदस्य तसेच सोनाली राऊळ हिने श्री. सावंत यांचे आभार मानत ऋण व्यक्त केले.