*कोंकण एक्सप्रेसस*
*निगुडे तेलवाडी सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा न केले बाबत व पाणीपुरवठा वारंवार खंडित विरोधात ग्रामपंचायत निगुडे येथे उपोषण
*बांदा : प्रतिनिधी*
निगुडे तेलवाडी येथे सार्वजनिक विहीर असून या ठिकाणी अनेक लोक त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत होते परंतु सन २०२२/ २०२३ मध्ये सदर विहिरीतील गाळ उपसा करून त्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे वित्त आयोगामध्ये तरतूद केली असताना गेली दोन वर्ष झाले याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्णता दुर्लक्ष करीत आहे .वारंवार निगुडे नळ पाणी योजनेच्या पाणीपुरवठा मध्ये बिघाड होत असल्यामुळे पिण्याचे स्त्रोत्र हे सार्वजनिक विहीर असून त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. सदर विहिरीतील गाळ उपसा ०५: वर्षांपूर्वी करण्यात आला होता त्याचप्रमाणे विहिरीमध्ये टीसीएल पावडर टाकली जात नाही. वारंवार ग्रामसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवला जातो परंतु ग्रामपंचायत या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांच्या मनमानीला कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे निगुडे तेलवाडी ग्रामस्थ व माजी लोकप्रतिनिधी निगुडे ग्रामपंचायत च्या विरोधात उद्या मंगळवार दि.११ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ०८:०० वाजता ग्रामपंचायत निगुडे येथे बेमुदत उपोषण करणार आहे. यासंदर्भात दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला वाडीतील २३ जणांच्या सही सहीत पत्र देण्यात आलेले आहे . परंतु ठोस निर्णय घेण्याकरता ग्रामपंचायत प्रशासन कामसुकारपणा करत आहेत. तसेच सदरचे पत्र माहितीसाठी मा. उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, सावंतवाडी,मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती ,सावंतवाडी तसेच मा. पोलीस निरीक्षक बांदा यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे नियोजित उपोषण हे उद्या सकाळी ०८:०० होणार आहे. असे निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सांगितलेले आहे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी म्हटले आहे..