डांगमोडे येथील जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये महिला गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ आणि पुरुष गटामध्ये जय गणेश पिंगळी कबड्डी संघ विजेता

डांगमोडे येथील जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये महिला गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ आणि पुरुष गटामध्ये जय गणेश पिंगळी कबड्डी संघ विजेता

*कोंकण एक्सप्रेस*

*डांगमोडे येथील जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये महिला गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ आणि पुरुष गटामध्ये जय गणेश पिंगळी कबड्डी संघ विजेता*

*मालवण : प्रतिनिधी*

.डांगमोडे येथील नवतरुण मित्र मंडळाच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मसुरे डांगमोडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेमध्ये महिलांच्या गटामध्ये एस एम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ तर पुरुष गटामध्ये जय गणेश पिंगळी या कबड्डी संघाने अंतिम विजेतेपद पटकावले.तर उपविजेतेपद महिला गटामध्ये होली क्रॉस सावंतवाडी आणि पुरुष गटामध्ये संघर्ष कोचरा या संघाने पटकावले. दोन्ही गटातील विजयी संघांना रोख रुपये सात हजार आणि उपविजेत्या संघाला रोख रुपये 5000 नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील सर्व चषक क कै. शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केले होते…….. महिला गटामध्ये उत्कृष्ट डिपेंडर म्हणून कुमारी पलक गावडे, (एस एम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ ), उत्कृष्ट चढाईपट्टू निकिता राऊत( होली क्रॉस सावंतवाडी), अष्टपैलू खेळाडू काजल नार्वेकर (एस एम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ) यांची निवड करण्यात आली तर पुरुष गटामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून परेश वालावलकर (जय गणेश पिंगळी), उत्कृष्ट चढाई पट्टू गणपत दाभोलकर( संघर्ष कोचरा), उत्कृष्ट डिपेंडर राज सावंत (जय गणेश पिंगळी) यांची निवड करण्यात आली. या सर्वांना प्रत्येकी रोख रुपये पाचशे एक आणि स्मृती चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन महिला दिनाचे औचित्य आणि श्री देव रवळनाथ डांगमोडे मंदिरातील वार्षिक गोंधळाचे अवचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माजी जि प अध्यक्ष सौ सरोज ताई परब यांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी सिंधुदुर्ग शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती छोटू ठाकूर, पंचायत समिती माजी सदस्य गायत्री ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे,बाबू आंगणे, पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, कृष्णा ढोलम, समीर म्हाडगुत, वेरली सरपंच धनंजय परब मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, सौ पूजा ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मालोंड गावच्या सरपंच श्रीमती फणसगावकर मॅडम, गार्गी चव्हाण, पत्रकार निवास पंडित, समीर ठाकूर, किशोर ठाकूर, ओमकार ठाकूर, नितीन हडकर, पुरुषोत्तम शिंगरे ,जितेंद्र परब, अशोक बागवे, बाळ प्रकाश ठाकूर, नारायण ठाकूर, किशोर ठाकूर, अमित ठाकूर, सुभाष ठाकूर, महेश ठाकूर, राजा ठाकूर, रोहिदास ठाकूर, गुरु ठाकूर, सोमा ठाकूर, अक्षय ठाकूर, विष्णू ठाकूर, संकेत ठाकूर, कृष्णा चव्हाण, बापू चव्हाण, अजित चव्हाण, अनिल ठाकूर, समीर ठाकूर, कमलेश ठाकूर, रवी ठाकूर, रमेश ठाकूर, मोहन ठाकूर आणि नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महिला सामन्यांमध्ये एकूण आठ संघाने तर पुरुष सामन्यांमध्ये एकूण नऊ संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून तुषार साळगावकर, पंचप्रमुख म्हणून प्रीतम वालावलकर आणि स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून अमित गंगावणे,सागर पांगुळ, जयेश परब, हेमंत गावडे, प्रथमेश नाईक, शैलेश नाईक, सिताराम रेडकर, गौरव सांडव, महेश सावंत , विवेक नेवाळे , प्रथमेश आढाव, नितीन हडकर यांनी काम पाहिले. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन आणि मालवण कबड्डी असोसिएशन, नवतरुण मित्र मंडळ यांचे स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान लाभले. या वेळी फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते. मालवणचे सुपुत्र आणि कबड्डी मध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल नितीन हडकर यांचा नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने दत्ता सामंत याच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!